- भारतीय-अमेरिकन मृदा शास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांना ११ जून रोजी जागतिक अन्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. माहिती वैभव शिवडे
- डॉ. रतन लाल यांना हा पुरस्कार नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि हवामानातील बदल कमी करणाऱ्या खाद्यपदार्थाच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आला आहे.
- हा पुरस्कार विजेते ते आठवे भारतीय ठरले आहेत.
- भारतीय भात आणि पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रक्रिया तातडीने थांबवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. माहिती वैभव शिवडे
- त्यांनी मृदा संवर्धनासाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा फायदा ५०० दशलक्ष पेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना झाला आहे.
● डॉ.रतन लाल
- जन्म : ५ सप्टेंबर १९४४) (कर्याल, पश्चिम पंजाब-सध्या पाकिस्तान)
- शिक्षण : Bsc Agr (१९६३ पंजाब कृषी विद्यापीठ), Msc (Soils) (१९६५-भारतीय कृषी संशोधन संस्था), PhD (Soils) (१९६८- ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी)
- ते सध्या ओहियो राज्य विद्यापीठातील अन्न, कृषी आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
- ओहियो विद्यापीठातील 'कार्बन मॅनेजमेंट अँड सिक्वेस्ट्रेशन सेंटर'चे संस्थापक तसेच संचालक आहेत. माहिती वैभव शिवडे.
- त्यांनी नायजेरियातील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय संस्था येथे संशोधन सुरू केले.
- २००७ मध्ये IPCC ला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळी रतन लाल IPCC चा भाग होते
● पुरस्काराबद्दल
- सुरुवात: १९८७
- पुरस्कार देणारी संस्था : वर्ल्ड फूड प्राईझ फाऊन्डेशन, आयोवा
- स्वरूप-२.५ लाख अमेरिकन डॉलर
- कृषी क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखला जातो.
● मागील वर्षीचे विजेते
- २०१९ सायमन ग्रूट (नेदरलँड)
- नोबेल पुरस्कार विजेते नॉर्मन बोरलॉग (हरित क्रांतीचे जनक) यांनी या पुरस्काराची निर्मिती केली.
- पहिले विजेते : एम.एस.स्वामिनाथन (१९८७)
● पुरस्कार मिळवणारे भारतीय
- एम. एस. स्वामिनाथन (१९८७)
- वर्गीज कुरियन (१९८९)
- गुरुदेव खुश (१९९६)
- बी. आर. बारवाले (१९९८)
- सुरिंदर के. वासल (२०००)
- मोडदुगु विजय गुप्ता (२००५)
- संजय राजाराम (२०१४)
- रतनलाल (२०२०)
No comments:
Post a Comment