संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न व कृषी संघटनेनी (FAO) 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट रिपोर्ट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी वर्ष 1990 ते वर्ष 2020 या कालावधीत 236 देश आणि प्रांतांमध्ये असलेल्या वनांच्या संबंधित स्थितीचा अभ्यास केला गेला आहे.
अहवालातल्या ठळक बाबी
🔸गल्या 30 वर्षांत सुमारे 178 दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. शाश्वत व्यवस्थापनाच्या वाढीमुळे जंगले नष्ट होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. वर्ष 2015-2020 या कालावधीमध्ये जंगले नष्ट होण्याचे प्रमाण अंदाजे 10 दशलक्ष हेक्टर (mha) पर्यंत घसरले आहे, जे वर्ष 2010-2015 या कालावधीमध्ये 12 दशलक्ष हेक्टर एवढे होते.
🔸जगले नष्ट होण्याचे प्रमाण कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले आहे. जंगले नष्ट होण्याचे प्रमाण वर्ष 1990 ते वर्ष 2000 या दशकात वार्षिक 7.8 दशलक्ष हेक्टर एवढे होते, तर हे प्रमाण वर्ष 2000 ते वर्ष 2010 या दशकात वार्षिक 5.2 दशलक्ष हेक्टर आणि वर्ष 2010 ते वर्ष 2020 या दशकात वार्षिक 4.7 दशलक्ष हेक्टर एवढे होते.
🔸जगातले एकूण वनक्षेत्र 4.06 अब्ज हेक्टर (bha) आहे, जे एकूण भूभागाच्या 31 टक्के आहे. हे क्षेत्र प्रति व्यक्ती 0.52 हेक्टर इतके आहे.
🔸जगातल्या वनक्षेत्राचे सर्वात मोठे प्रमाण उष्णकटिबंधीय (45 टक्के) आहे आणि त्यानंतर बोरियल, समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय वनांचे प्रमाण आहे.
🔸जगातले 54 टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र केवळ रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आणि चीन या पाच देशांमध्ये आहे.
🔸खडानुसार आकडेवारीनुसार, वर्ष 2010 ते वर्ष 2020 या कालावधीत आफ्रिकेमध्ये सर्वाधिक जंगलतोड झाली, ज्याचा दर वार्षिक 3.9 दशलक्ष हेक्टर एवढा होता. त्याच्या पाठोपाठ दक्षिण अमेरिकेचा (2.6 दशलक्ष हेक्टर) क्रमांक लागतो. या काळातच आशिय, ओशनिया आणि युरोप यात सर्वाधिक वनक्षेत्र वाढले.
No comments:
Post a Comment