Tuesday, 11 August 2020

छोडो भारत/चले जाव आंदोलन सुरूवात (1942)

प्रास्ताविक -
चलेजाव आंदोलन काळात विस्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते.

🔸क्रिप्स शिष्टाई (मार्च 1942) फसल्याने राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्य चळवळ अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेतला.
🔸8 ऑगस्ट 1942  रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर भरलेल्या काँग्रेसची महासमिती सभा (AICC) भरली.
🔸या दिवशी पं.जवाहरलाल नेहरूंनी प्रसिद्ध 'छोडो भारत' चा ठराव मांडला.
🔸8 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी भारतीय जनतेस 'करा किंवा मरा' हा संदेश दिला सोबतच ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले.

🔸9 ऑगस्ट रोजी पहाटे ब्रिटिशांनी 'Operation Zero Hour' राबवत गांधीजी,पं.नेहरू,मौलाना आझाद,राजेंद्रप्रसाद,पटेल,कृपलानी यांच्यासह 148 महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध/अटक केले.
🔸 गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये तर नेहरू (अल्मोडा जेल),मौ.आझाद (बाकुडा जेल) व बाकीच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आले.
🔸या नेत्यांच्या अटकेची बातमी देशभर पसरली गेली व या चळवळीची तीव्रता वाढतच गेली.

No comments:

Post a Comment