Sunday, 16 August 2020

लॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई.



🔰मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क 13 पुस्तके लिहून काढली आहेत.

🔰करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत.

🔰मार्च महिन्यापासून आतापर्यंत पिल्लई यांनी 13 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे.

🔰पिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1983 मध्ये प्रकाशित झालं होतं.

🔰राज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची 105 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण 121 पुस्तके लिहिली आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...