Saturday, 18 July 2020

सौर स्थिरपाद (solar constant) -

सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये १५ कोटी कि.मी. अंतर असल्यामुळे पृथ्वीला फारच कमी सौरशक्ती मिळते. पृथ्वीवरील दर चौरस से.मी. क्षेत्रफळाच्या भागास प्रत्येक मिनिटाला सुमारे १.९४ कॅलरी उष्णता मिळते. या उष्णतेलाच ‘सौर स्थिरांक’ असे म्हणतात. सूर्यापासून मिळणाऱ्या या उष्णतेमध्ये वाढ किंवा घट होत नाही. उष्णतेचे हे प्रमाण सातत्याने टिकून असते, म्हणून त्यास ‘सौरस्थिरपद’ असेही म्हणतात. दर मिनिटाला पृथ्वीला मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण जरी खूपच कमी असले तरी त्या उष्णतेमुळे पृथ्वीवर आवश्यक ते भौतिक बदल घडून येतात.

# पृथ्वीची भूधवलता (albedo) -

‘सूर्याने उत्सर्जित केलेली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी परंतू पृथ्वीचा पृष्ठभाग न तापवता परावर्तित होणारी सौरशक्ती यांचे गुणोत्तर म्हणजे भूधवलता होय’. सर्वसाधारणपणे ३५ % सौरशक्ती ही परावर्तीत केली जाते. यालाच पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. 

**भूपृष्ठ आणि भूधवलतेचे प्रमाण (टक्के)
1) विषुववृत्तीय अरण्ये - 21
2)सुचिपर्णी अरण्ये -13
3) पानझडी अरण्ये -  18
4) सव्हाना -15
5) वाळवंट -28
6) सागर विभाग- 7 ते 23
7) खंडार्गत जलविभाग - 2 ते 78
8)बर्फ - 40 ते 90
9) ओली वाळू - 30 ते 35
10) खडकाळ प्रदेश - 10 ते 12
11) पिके - 10 ते 15
12) हिरवे गवत  - 8 ते 27

# अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती -(apehelion and perihelion)

पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंब वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करते. या परिभ्रमण काळात पृथ्वी कधी सूर्याजवळ तर कधी सूर्यापासून दूर जाते. ४ जुलै रोजी सूर्य व पृथ्वीमधील अंतर १५१२ लक्ष कि.मी. असते. हे अंतर सर्वात जास्त असल्यामुळे यास ‘अपसूर्य स्थिती’(Apehelion) असे म्हणतात. या स्थितीत पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटर क्षेत्राला १.८८ कॅलरी उष्णता मिळते. म्हणजेच सौरशक्ती मिळण्यात घट होते. ३ जानेवारी रोजी सूर्य व पृथ्वीमधील अंतर १४६४ लक्ष कि.मी. असते. हे अंतर वर्षातील कमीत कमी असल्यामुळे या दिवशीच्या पृथ्वीच्या स्थितीला ‘उपसूर्य स्थिती’ (perihelion)असे म्हणतात. उपसूर्य स्थितीत पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटरला २.०१ कॅलरी उष्णता मिळते. ही उष्णता सरासरीपेक्षा थोडीशी जास्त असते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...