Wednesday, 23 August 2023

प्रथिने (Proteins)-

√ प्रथिने ही अमिनो आम्लापासून बनलेली असतात.
√ शरीराला २४ अमिनो आम्लाची गरज असते.
√ त्यापैकी नऊ (९) अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाही.
√ त्यामुळे ती आहारात पुरवावी लागतात, म्हणून अशा अमिनो आम्लांना "आवश्यक अमिनो आम्ल'' असे म्हणतात.

√ आवश्यक अमिनो आम्ल पुढील प्रमाने आहे.

१) लायसिन
२) ल्यूसिन
३) आयसोल्युसिन
४) व्हलिन
५) हिस्ट्रीटीन
६) थ्रिओनिन
७) टिष्ट्रोफॅन
८) मितिओनिन
९) फिनाईल अॅलनिन

√ अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधीकधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

● प्रथिनांचे कार्य-

√१)शरीरांची वाढ व विकास करणे.
√२) उतींचे प्रमाण वाढविण्यासाठी.
√३) प्रति पिंडे (Anti bodies), विकरे, संप्रेरके, हार्मोन्स यांच्या निर्मितीसाठी.
√४) रक्त निर्मितीतील व ऊर्जा निर्मितीसाठी प्रथिने कार्य करतात.

● प्रथिनांचे स्त्रोत-

√१) प्राणीज स्त्रोत : दुध, अंडी, मासे, मांस
√२) वनस्पतीज स्त्रोत :
i) दाळी- तुर, मुंग, हरभरा, उडीद, मसूर
ii) धान्य-ज्वारी, बाजरी, नाचणी, गहु
iii) तेलबिया - तीळ, कडई, शेंगदाणे, सोयाबिन, बदाम

● प्रथिनांचे प्रमाण-

१. डाळीमध्ये: २० ते २५ टक्के
२. सोयाबिनमध्ये: ४३.२ टक्के (सर्वाधिक)
३. दुधामध्ये: ३.२ ते ४.३ टक्के
४. अंडी: १३टक्के
५. मासे: १५ ते २३ टक्के
६. मांस: १८ ते २६ टक्के

√ प्राणिज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा अधिक महत्वाची असतात, कारण त्यामध्ये सर्वाधिक अमिनो आम्ल' असतात.

★★★★★★★★★★★★★★★★★★

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...