Friday, 17 July 2020

महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार.

🔰जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.

🔰विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.

🔰संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत.

🔰यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.

🔴भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी..

🔰भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

No comments:

Post a Comment