Monday, 12 December 2022

स्नायू संस्था (Muscular System)

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

अस्थी स्नायू,
मृदू स्नायू आणि
हृदय स्नायू.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.
शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.

🌷मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.
पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.

🌷हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.

🌷या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.

🌷हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.
स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.
स्नायूंचे तीन प्रकार आहेत.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷1) हृदय स्नायू (Cardiac Muscles):🌷🌷

🌷हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.

🌷हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.

🌷आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles):🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷 या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷

🌷🌷2) मृदू स्नायू (Smooth Muscles): 🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.

🌷अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.

उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी.

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷3) अस्थी स्नायू (Skeletal Muscles):🌷🌷

🌷हे स्नायू शरीरात अस्थींना दोन्ही बाजूंनी जोडलेले असतात म्हणून त्यांना अस्थी स्नायू किंवा कंकांली स्नायू (Skeletal Muscle) म्हणतात.

🌷या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेऊ शकतो. म्हणून यांना ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscles) असे म्हणतात.

🌷सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येतात म्हणून यांना पट्टकी स्नायू  (Straited Muscles) म्हणतात.

🌷ऐच्छिक स्नायूंच्या पेशी लांबट, दंडाकृती, अशाखीय तसेच बहुकेंद्रकी असतात.
उदा. हात, पाय, इत्यादीमधील स्नायू.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

🌷शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लूटीअस मॅक्सिमस (Gluteus maximus) आहे.

🌷हा मांडीच्या हालचालींसाठी आवश्यक असलेला स्नायू आहे.

🌷पाय पसरणे, पाय फिरवणे, मांडी घालणे अशा प्रकारचे कार्य ग्लूटीएस मॅक्झिमस मुळे शक्य होतात.

🌷 सर्वात लहान स्नायू स्टेपीडीएस (Stepedius) आहे. तो कानातील स्टेप्स या हाडांची हालचाल प्रमाणापेक्षा जास्त होऊ देत नाही.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...