Wednesday, 15 July 2020

सांधे (Joints)

◆ सांध्यांचे काम दोन प्रकारचे असते. एक म्हणजे निरनिराळी हाडे एकमेकांशी जोडणे आणि धरुन ठेवणे.

◆ दुसरे काम म्हणजे विशिष्ट प्रकारची हालचाल होऊ देणे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

● सांध्यांच्या रचनेप्रमाणे त्यांचे प्रकार असे :

★ करवती (अचल) सांधा :

◆ यात हालचाल होत नाही. हाडे पक्की जोडलेली असतात. उदा. कवटीची हाडे एकमेकाला अशी जोडलेली असतात.

★ बिजागरीचा सांधा : 

◆ या सांध्यात दाराप्रमाणे किंवा अडकित्त्याप्रमाणे एकाच दिशेने हालचाल होऊ शकते. उदा. गुडघा, कोपर, इ.

★ उखळीचा सांधा: 

◆ खुबा, खांदा यांमध्ये मागेपुढे, बाजूला वगैरे दोन-तीन दिशांनी हालचाल होऊ शकते.

★ सरकता सांधा : 

◆ यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर थोडी सरकू शकतात. उदा. मनगटातील सांधे, पायाचा घोटा, टाचा, तळवा यांतील सांधे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

★ ध्वनीची निर्मिती (Production of sound)

◆ जी भौतिक संकल्पना ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असते, त्यास ‘कंपन’ (vibration) असे म्हणतात.

◆ कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी हालचाल.

◆ कंपने ही दिसूही शकतात किंवा ती जाणवतात.

★ ध्वनीचे प्रसारण (Propagation of sound)

◆ ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

★ माध्यम म्हणजे काय ?

◆ ध्वनी ज्या पदार्थातून प्रसारित होतो त्या पदार्थाला ध्वनीचे माध्यम (Medium) म्हणतात. परत ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यम हे कणरहीत असावे. (Particle medium)

★ ध्वनीच्या प्रसारणाची संकल्पना

◆ ज्या वेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा, ज्या जागी कंपने तयार होतात. तेथून ध्वनीचे प्रसारण होते.

◆ सर्वप्रथम जिथे कंपन झाले आहे तेथील कण कंपनामुळे विचलीत होतात. (हालचाल होते).जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हे विचलीत कण त्यांच्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करतात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतात. पुन्हा समोरचा विचलीत कण त्याच्या पुढच्या कणावर बल प्रयुक्त करून मूळ स्थितीत येतो.

◆ अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारील कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आप-आपल्या जागेवर येतो.

◆ म्हणजेच असे म्हणता येईल की ध्वनीचे प्रसारण हे स्वत: कण करतात. परंतु ते त्यांच्या मूळ जागेवर राहूनच.

◆ ध्वनीचे प्रसारण हे तरंगाच्या (waves) स्वरुपात होते. म्हणजेच ज्या माध्यमात कण हे जितके जवळ असतात. तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते.

◆ आपणास माहिती आहे स्थायू मधील कण अगदीच जवळ-जवळ असतात, म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो.

◆ ज्या तरंगात कणाचे दोलन मध्य स्थितीच्या वर आणि खाली होते आणि हे दोलन (oscillation) तरंग प्रसरणाच्या रेषेला लंब असते.

◆ थोडक्यात सांगायचे तर, जे तरंग वर-खाली व रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग (Transverse Waves) म्हणतात.

★ अनुतरंग (Longitudinal waves)

◆ ज्या तरंगात कणाचे दोलन (Oscillation) पुढे आणि मागे होते आणि त्यांचे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार होते त्यांना “अनुतरंग” म्हणतात.
म्हणजेच पुढे-मागे होणारे आणि प्रसरण रेषेच्या दिशेने होणारे दोलन म्हणता येईल.

No comments:

Post a Comment