Tuesday 14 July 2020

संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी INST संस्थेच्या वैज्ञानिकांनी अतिसूक्ष्म कण तयार केले.


🅾मोहाली (पंजाब) येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) वैज्ञानिकांनी चिटोसनसह अतिसूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल्स) तयार केले आणि संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी या कणाला झिंक ग्लुकोनेटसहीत भारित केले.

🔷संशोधनाविषयी..

🅾हाडांची सामान्य स्थिती कायम राखण्यासाठी जस्ताच्या (झिंक) योग्य प्रमाणाची आवश्यकता असते. संधिवाताच्या रुग्णांमध्ये आणि संधिवात-प्रेरित प्राण्यांमध्ये त्याची पातळी कमी झाल्याची नोंद आहे. झिंक ग्लुकोनेटच्या रूपात जस्ताच्या पूरक मात्रेची जैव उपलब्धता मानवांमध्ये खूप कमी आहे हे देखील तितकेच खरे आहे.

🅾चिटोसन हे क्रॉस्टेसियन्सच्या बाह्य कंकालातून प्राप्त केलेल्या बहुतेक बायोपॉलिमरांपैकी एक म्हणजे जैव अनुरूप, जैव विघटनशील नैसर्गिक पॉलिसेकेराइड असून शोषण प्रोत्साहन वैशिष्ट्ये दर्शविते.

🅾वैज्ञानिकांनी विशेषतः चिटोसन निवडले आहे कारण ते जैव विघटनशील, जैव अनुरूप, बिन विषारी आणि नैसर्गिकरीत्या म्यूकोएडेसिव्ह आहे. यापूर्वी 'मॅग्नेशियम रिसर्च' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, उंदरांवर याचा प्रयोग केल्यावर झिंक ऑक्साईडच्या प्रमाणित स्वरुपातील सीरम झिंक पातळीत किंचित वाढ झाली, तर नॅनो स्वरूपात सीरम झिंकच्या पातळीत जास्त वाढ झाली परिणामी जस्ताची जैवउपलब्धता वाढली. यामुळे झिंक ग्लुकोनेट नॅनो स्वरूपात विकसित करण्यासाठी नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या चमूला प्रेरणा मिळाली.

🅾वैज्ञानिकांच्या चमूने जैव रासायनिक विश्लेषण, सुक्षमदर्शकीय निरीक्षणे आणि सूज आल्यासारखी लक्षणे यासारख्या विविध बाबींचे मूल्यांकन केले आणि झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांद्वारे झिंक ग्लूकोनेटच्या मुक्त स्वरूपाच्या तुलनेत उत्कृष्ट उपचारात्मक प्रभाव शोधण्याचे सुचविले. झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांच्या सूज येण्याच्या गुणधर्मामुळे ते या निष्कर्षाप्रत येऊ शकले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...