Monday 13 July 2020

General Knowledge

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ

● कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भारतातली कोणती संस्था भाग घेणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?
: रशिया

● 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अ‍ॅसेसमेंट, 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: खाद्यान्न व कृषी संघटना

● असा कोणता देश आहे ज्याने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव ‘रेहॉव्ह टॅगोर’ असे ठेवले?
: इस्त्राईल

● भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: व्ही. विद्यावती

● ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (CDC) ही संस्था कोणत्या देशात आहे?
:  संयुक्त राज्ये अमेरिका

● बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कोणत्या राज्याने 'होप' हे संकेतस्थळ कार्यरत केले?
: उत्तराखंड

● जागतिक 'एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक आर्थिक मंच

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?
: बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?
: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
: बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?
: म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?
: कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?
: इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
: बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
: डॉ. हर्ष वर्धन

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...