Monday, 6 July 2020

G2G तरतुदीनुसार अफगाणिस्तान आणि लेबनॉनकडे गहूची निर्यात केली जाणार

- गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट (G2G) तरतुदीनुसार भारताने सुमारे एक लक्ष टन गहू लेबनॉन व अफगाणिस्तान या देशांकडे निर्यात करणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लेबनॉनकडे 40 हजार टन गहू तर अफगाणिस्तानकडे 50 हजार टन गहू निर्यात करणार.

- 2020 साली भारतात 106.21 दशलक्ष टन एवढे गहूचे विक्रमी उत्पन्न घेतले जाण्याचे अपेक्षित आहे.

- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी मंत्रालयाने जादा शेतमाल निर्यात करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशात गहूचे उत्पन्न जास्त आहे, परंतु जास्त दरामुळे भारतीय गहू जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडले आहे. आता भारत सरकार मानवतावादी कार्याच्या आधारावर आशियाई आणि आफ्रिकी देशांकडे गहू निर्यात करीत आहे.

- राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लिमिटेड ही कृषी उत्पादनांसाठी विपणन सहकारी संस्थांची एक शीर्ष संस्था आहे, जी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

- त्याची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

- लेबनॉन हा पश्चिम आशियातला एक देश आहे. बेरूत हे देशाचे राजधानी शहर आहे आणि लेबनानी पाउंड हे राष्ट्रीय चलन आहे.

- अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. काबुल हे देशाचे राजधानी शहर आहे आणि अफगाणिस्तानी अफगाणी हे राष्ट्रीय चलन आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...