Monday, 13 July 2020

तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या CEO पदावरून हटवले.


◾️नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना प्रभारी सीईओपद देण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम पाहतील. पुढील काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे.

◾️नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपातर्फे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

◾️शुक्रवारी, १० जून रोजी जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

◾️तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बळकवल्याचा आरोप आजच्या बैठकीत सिद्ध झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...