१) ऑडमचा पूल : मन्नारचे आखात व धनुष्यकोडी यामधील मार्ग. यास रामसेतू असे म्हणतात.
२) आगा खान पॅलेस : येथे चले जाव आंदोलन काळात गांधीजींनी स्थानबद्ध करण्यात आले होते.
३) आनंद भवन : पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर.
४) आनंद : गुजरातमधील अमूल दूध कारखान्याचे ठिकाण.
५) आवडी : रणगाडा तयार करण्याचा कारखाना.
६) केप कामोरीन:भारताचे शेवटचे टोक व विवेकानंद शीला स्मारक.
७) चित्तोडगढ : राजस्थानमधील ऐतिहासिक शहर.
८) दलाल स्ट्रीट : मुंबईतील शेअर बाजाराचे ठिकाण.
९) हळदीघाट :अकबर व राणाप्रताप यांच्यात झालेल्या युद्धाचे ठिकाण.
१०) गोवळकोंडा :आंध्र प्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण व कुतूबशाहीची राजधानी.
११) लोथल : हडप्पाकालीन बंदर.
१२) मदुराई : मीनाक्षी देवीचे देऊळ.
१३) मिर्झापूर: भारताच्या प्रमाणवेळेचे ठिकाण.
१४) पिंपरी – चिंचवड : भारतातील सर्वात मोठा पेनसिलीनचा कारखाना.
१५) पन्ना : मध्यप्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण.
१६) पोखरण : भारताचे सन १९७५ मध्ये अणुस्फोट केला ते राजस्थानमधील ठिकाण.
१७) श्रीहरीकोट्टा :आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील भारताचे अवकाश प्रक्षेपण केंद्र.
१८) हसन : उपग्रहावर नियंत्रण ठेवणारे केंद्र.
१९)चंडीपूर : ओडिशा राज्यातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्र.
२०)व्हिलर बेटे : ओडिशा राज्यातील दुसरे क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र.
२१)अजमेर : ख्व्याजा मोइनुद्दिनि चिस्तीचा दर्गा.
२२)आर्वी: महाराष्ट्रातील पुणे येथील आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र.
२३)अमृतसर: शिखांचे सुवर्णमंदिर व जालीयनवाला बागेचे ठिकाण.
२४)नांदेड : शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी.
२५)जंतरमंतर : महाराजा जयसिंग यांनी बांधलेली दिल्ली येथील वेधशाळा.
२६)फतेहसागर : सरोवराच्या खडकावर बांधलेली जगातील एकमेव वेधशाळा.
२७)टाटानगर : जमशेदजी टाटा यांनी उभारलेला लोखंडाचा कारखाना.
२८)बौध्दगया : गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण.
२९)इलेफंटा : महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले शिवाचे लेणे.
३०)नानगल : अणुभट्टीकरिता लागणारे जड पाणी तयार करणारे केंद्र.
३१)नेफानगर : वृत्तपत्राचा कागद तयार करणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना.
३२)चंदीगड : भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर.
३३)अमरावती : आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे नवे ठिकाण.
३४) व्हिलर बेटे: ओडिशा राज्यातील लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीचे नवीन ठिकाण.
३५)पाटणा :पूर्वीचे नाव पाटलीपुत्र आणि मगध साम्राज्याची राजधानी.
३६)पानिपत : येथे तीन प्रसिद्ध लढाया झाल्या. सध्या हे ठिकाण हरियाणा राज्यात आहे.
No comments:
Post a Comment