Monday, 6 July 2020

‘जन औषधी सुगम’ मोबाइल अॅप

- कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे “स्वास्थ के सिपाही” या नावाने ओळखले जाणारे औषधविक्रेते भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनौषधी परीयोजनेच्या (PMBJP) अंतर्गत रुग्णांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अत्यावश्यक सेवा आणि औषधे वितरीत करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ते सरकारच्या सामाजिक अंतराच्या उपक्रमाला पाठबळ देत आहेत.

- सर्वसामान्य नागरिकांना निकटचे जनौषधी केंद्र शोधण्यासाठी आणि औषधांच्या किंमतीसह त्यांची उपलब्धता तपासण्यासाठी “जन औषधी सुगम” हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

- जन औषधी केंद्र, भारत सरकारचे रसायन व खते मंत्रालय, औषधनिर्मिती विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय फार्मा PSU विभागाद्वारे हा उपक्रम राबविला जात. सध्या देशभरातल्या 726 जिल्ह्यांमध्ये 63000 केंद्रे कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...