◆ युद्धाचे कारणः
√ युरोपात इंग्लंड व फ्रान्स यांच्यादरम्यान ऑस्ट्रीयन वारसा हक्क युद्ध' (Austrian War of Succession) सुरू झाल्यामुळे भारतातही इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू झाले.
◆महत्त्वाच्या घटना:
√ १७४५ मध्ये ब्रिटिश नौदलाने फ्रेंचाची जहाजे ताब्यात घेतली.
√ त्यामुळे फ्रेंच गर्व्हनर डुप्ले याने १७४६ मध्ये इंग्रजांचे मद्रास जिंकून घेतले.
√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबाकडे फ्रेंचांविरूद्ध मद्रास मुक्त करण्यासाठी मदतीची मागणी केली.
√ कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याने फ्रेंचांना दिलेला आदेश न मानल्यामुळे १७४८ मध्ये अन्वरूद्दीनचे सैन्य व फ्रेंच यांमध्ये प्रसिद्ध सेंट थोमची लढाई' (Battle of St.Thome) झाली.
√ या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे के पॅराडाईस याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्यात केवळ ९३० सैनिक होते, तर महफूज खान याच्या नेतृत्वाखालील नवाबाच्या सैन्यात १०,००० सैनिक होते. तरीही फ्रेंचांनी नवाबाच्या सैन्याचा दारूण पराभव केला.
√ युरोपात ऑस्ट्रीयन वारसाहक्क युद्ध संपताच भारतातील युद्धही थांबले.
√ 'अॅक्स ला शापेल तहा द्वारे (Treaty of Aix-La-Chapelle) फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास परत केले.
√ मात्र युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व सिद्ध झाले.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
No comments:
Post a Comment