Tuesday, 27 August 2024

समुद्रगुप्त


 ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विंसेट स्मिथ यांना भारताचा नेपोलियन मानतात..

🌷  समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

☘  समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.समुद्रगुप्तची विविध प्रकारची नाणी आहेत

परशु ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन,वीणावादन इत्यादि प्रकार आहेत.

🌷   व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त:हे नाव कोरलेले आहे...

🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...