Monday 6 July 2020

लॉर्ड वेव्हेल

☘  कार्यकाळ

(१९४३-१९४७)

🌷  ऑक्टोबर, १९४३  मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त  झाले.

🌷   वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बैठक सिमला  येथे बोलवली.

🍁   इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात  १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले.

☘   कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार  स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली.

🍁  आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

☘  भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.

🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂

No comments:

Post a Comment