Friday, 24 July 2020

फुल व फुलांचे भाग

◾️ फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात.

◾️फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.

🌸 निदलपुंज (Calyx) : कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.

🌸 दलपुंज (Corolla) : दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर

🌸 पुमंग (Androecium) : फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.

🌸 जायांग : (Gynoecium) : फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षी वृत व अंडाशय असते.

🔰 परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील
📌 बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर
📌 अंडाशयाचे रूपांतर फळात होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...