Wednesday 22 July 2020

६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

◾️जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

◾️त्याचबरोबर माध्यमांच्या माहितीनुसार ६४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळ्यात खंड पडल्याचे म्हटले जात आहे.

◾️यासंदर्भातील माहिती नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिली आहे.

◾️तसेच हा पुरस्कार सोहळा वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

◾️नोबेल आठवडा ज्या प्रकारे आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही.

◾️कोरोनाच्या महामारीमुळे सध्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे. हे वर्ष गेल्या वर्षीच्या तुलनेत निराळे आहे.

◾️सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.

◾️दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

No comments:

Post a Comment