Friday, 24 July 2020

सागरी सीमा कशा असतात माहीत आहे का..?!

✳️जमिनीवरील सीमा आखता येतात आणि दिसतातही पण सागरी सीमा अधोरेखित करणे हे कठीण काम असते.
सागरी सीमेवरुन वाद अनेकवेळा होत असतो, खासकरुन तटीय देशात हा वाद कायमच होतो.

✳️भारताची सागरी सीमा सर्व बेटांसह जवळपास 7,576 किलोमीटरची आहे. एखाद्या देशाची सागरी सीमा किनाऱ्यापासून 22.22 किलोमीटरची म्हणजे 12 नॉटीक मैलाची ( सागरी मैल) असते. हि रेषा आहोटीच्या रेषेपासून मोजतात.

✳️काही विशिष्ट परिस्थितीत ती 24 सागरी मैलांपर्यंत वाढविली जाऊ शकते. जेव्हा दोन राष्ट्रे 12 किंवा 24 सागरी मैलांच्या आतमध्ये स्थित असतात, तेव्हा ही रेषा त्या दोघांमधील अंतर विभागून आखली जाते.

✳️कोणत्याही देशाच्या जहाजांना 12 (किंवा 24) सागरी मैलांपलीकडे मुक्त संचार उपलब्ध आहे. त्या रेषेच्या आतमध्ये संचारासाठी त्या-त्या देशाची परवानगी अनिवार्य आहे.

✳️संयुक्त राष्ट्रसंघातील सभासद देशांनी 1994 साली ‘संयुक्त राष्ट्रसंघ संमत सागरी कायदा संकेत’ अमलात आणला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...