२४ डिसेंबर २०२१

वातावरणाचे थर.

◆ पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

◆ भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो.

◆ या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.

◆ समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

★ हवेतील घटक घटकाचे प्रमाण

◆ नायट्रोजन 78.03%

◆ ऑक्सीजन 20.99%

◆ कार्बडायक्साईड 00.03%

◆ ऑरगॉन वायु 00.94%

◆ हैड्रोजन वायु 00.01%

◆ पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

● एकूण हवा 100.00%.

2. तपस्तब्धी

◆ भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते.

◆ त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

◆ तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे.

◆ या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.

◆ ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे.

◆ हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

◆ मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

◆ मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.

◆ इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.

◆ एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो.

◆ या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर

◆ आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते.

◆ या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
------------------------------------------------
★ नदीमुळे निर्माण होणारी भूरूपे :-

● अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे :-

● युवावस्थेत :-

१) V आकाराची दरी :-
२) घळई (Gorge)
३) निदरी (Canyon)
४) कुंभगर्ता (Pot Holes)
५) धावत्या (Rapids)
६) धबधबा (Waterfall)
७) गुंफित गिरीपाद (Interlocking Spur)

● प्रौढावस्था व वृद्धावस्थेमध्ये

१) नागमोडी वळणे (River Meanders)
२) नालाकृती व चंद्राकृती सरोवरे (Ox-bowl)

● निक्षेपण कार्यामुळे :-

१) पर्वतीय मैदान (Piedmount Plains)
२) पूरमैदाने (Flood Plain)
३) त्रिभुज प्रदेश (Delta Region)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...