Wednesday, 15 July 2020

केंद्र सरकार देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक’ची स्थापना करणार



◆ केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात “फिश क्रायोबँक” यांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

◆ यासंदर्भातली घोषणा 10 जुलै 2020 रोजी “राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन” निमित्त करण्यात आली.

◆ “फिश क्रायोबँक” म्हणजे जिथे मत्स्य बीज (शुक्राणू) साठवून ठेवले जातात, ज्यामुळे मत्स्य उत्पादकांना निश्चित मत्स्यप्रजातीची उपलब्धता खात्रीशीरपणे होते.

★ ठळक बाबी

◆ हा उपक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालयामार्फत राबविला जाणार आहे.

◆ भारतात उभारण्यात येणारी अशी “फिश क्रायोबँक” ही जगातली पहिलीच असणार आहे.जॉइन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ फिश क्रायोबँकच्या स्थापनेसाठी नॅशनल ब्यूरो ऑफ फिश जेनेटिक्स रिसोर्स आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हे दोनही विभाग एकत्र काम करणार आहेत.

◆ भारत सरकारने वर्ष 2020-24 या कालावधीसाठी 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसह सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’चा हा एक भाग आहे.

◆ या उपक्रमामुळे प्रजातीच्या रक्षणासोबतच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात दूरगामी बदल होणार आणि उत्पादकता वाढविण्यात मदत मिळणार.

◆ मत्स्यव्यवसायक्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आणि मत्स्यउत्पादकांच्या कल्याणासाठी एक मजबूत आराखडा तयार करुन गुणवत्ता व आधुनिकीकरणाशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...