Friday, 10 July 2020

प्राचीन भारताचा इतिहास.

सिंधू संस्कृती

०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

💠💠प्राचीन भारत इतिहास.💠💠

वेद काल

०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.

०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.

०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.

०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.

०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.

०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.

🧩 ऋग्वैदिक काळ..

०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.

०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.

०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.

१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.

११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.

१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.

१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.

१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.

१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.

१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.

१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.

१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.

१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.

२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.

🧩उत्तर वैदिककाळ..

२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.

२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.

२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.

२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.

२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.

२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.

२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे.

💠💠महाराष्ट्राचा इतिहास.💠💠

🧩 मौर्य ते यादव...

🅾(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

🧩 मौर्य साम्राज्याचा काळ...

🅾महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

🧩 सातवाहन साम्राज्याचा काळ...

🅾सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष.

🅾महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

🧩 वाकाटकांचा काळ...

🅾वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

🧩कलाचुरींचा काळ...

🅾वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

🧩 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ...

🅾वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी.

🅾त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

🧩 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ..

🅾वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

🧩 यादवांचा काळ..

🅾महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता.

🅾यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment