Friday 17 July 2020

पोलीस दलात १२ हजार पदांची मेगा भरती:-

📚बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

📚गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

📚 डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

📚या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

1 comment:

  1. आधी भरलेले form त्याचा समावेश ह्या भरती प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे का?

    ReplyDelete