Thursday 9 July 2020

गव्हर्नर.

☑️भारतीय नोटा चलन म्हणून स्वीकारण्यास योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकार तर्फे खात्री म्हणून रिझर्व बॅंकेचे सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा लिहितात आणि त्यावर आपली स्वाक्षरी करतात.

☑️सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बॅंकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही.

☑️त्यानंतर स‍र जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.

☑️आधी वित्त सचिव आणि नंतर गव्हर्नर अशी दुहेरी भूमिका बजावणारे अधिकारीही झाले आहेत. त्यातही डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत. दि. ०१-०४-१९३५ पासून दि. ०५-०९-२००८ पर्यंत २१ विविध सनदी अधिकाऱ्यांनी गव्हर्नर म्हणून काम केले आहे.

☑️दि. ०३-०९-२०१३ पासून या पदावर रघुराम राजन हे आहेत. नुकताच, दि. ०४-०९-२०१६ ला उर्जीत पटेल यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.nov 2018 शक्तिकान्त दास हे RBI governor झाले...

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...