🔰रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
🔰ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.
🔴आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी...
🔰आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.
🔰वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.
🔰UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.
No comments:
Post a Comment