🔰भारत ही आशियातील तिसरी मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आमच्याकडे उद्योगस्नेही, स्पर्धात्मक व संधींनी परिपूर्ण असे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करोनाकाळातील टाळेबंदीनंतर आता पुन्हा हिरवी पालवी दिसत असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीकरिता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.
🔰ते म्हणाले, की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमची अर्थव्यवस्था जगातील जास्तीतजास्त खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ज्या संधी उद्योगांना आहेत त्या क्वचितच इतरत्र दिसून येतील. अलीकडच्या काळात कृषी, अवकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. जागतिक भांडवलाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आवाहन केले.
🔰आम्ही अर्थव्यवस्था जास्त उत्पादक, गुंतवणूकस्नेही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतात अनेक शक्यता व संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे साठवणूक व रसद पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहेत. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातही सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठय़ा उद्योगांना पूरक आहेत. संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून त्यात सुटय़ा भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील. यातही गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment