Tuesday 21 July 2020

महाराष्ट्र बद्दल माहिती


◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ लोकसंख्येच्या👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

◾️ महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते

◾️ युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ शेखरु म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.🐅

No comments:

Post a Comment