नामऐवजी वापरल्या जाणार्या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
1. पुरुषवाचक सर्वनाम
2. दर्शक सर्वनाम
3. संबंधी सर्वनाम
4. प्रश्नार्थक सर्वनाम
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
6. आत्मवाचक सर्वनाम
👉. पुरुषवाचक सर्वनाम :
याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
उदा. 1. मी गावाला जाणार.
2. आपण खेळायला जावू.
2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
उदा. 1. आपण कोठून आलात?
2. तुम्ही घरी कधी येणार?
3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.
👉. दर्शक सर्वनाम :
कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
उदा. 1. ही माझी वही आहे
2. हा माझा भाऊ आहे.
3. ते माझे घर आहे.
4. तो आमचा बंगला आहे.
👉. संबंधी सर्वनाम :
वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
2. जो तळे राखील तो पाणी चाखील.
👉 प्रश्नार्थक सर्वनाम :
ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
उदा. 1. तुझे नाव काय?
2. तुला कोणी संगितले.
3. कोण आहे तिकडे.
👉सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
2. कोणी कोणास हसू नये.
3. कोण ही गर्दी !
👉 आत्मवाचक सर्वनाम :
आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.
मराठीत मूळ 9 सर्वनाम
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
1. तो- तो, ती, ते
2. हा- हा, ही, हे
3. जो-जो, जी, जे
वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
1. मी- आम्ही
2. तू- तुम्ही
3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
No comments:
Post a Comment