Monday 8 November 2021

संयुगांची निर्मिती

व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण

इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.

धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या  बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात

धातु (Metal):

आपल्या बाह्यतम कक्षेतील  इलेक्ट्रॉन गमावून धन आयनांची निर्मिती करतात त्यांनाच कॅटायन असे म्हणतात आणि धातूंचा या गुणधर्माला विद्युत धन गुणधर्म असे म्हणतात

2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास  संयुगे तयार होतात.

अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.

रासायनिक बंध:

संयुगातील तसेच रेणूतील दोन किंवा अधिक अणूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध असे म्हणतात.

रासायनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाण-घेवाण होऊन किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होतो त्यानुसार रासायनिक बंधाचे दोन प्रकार पडतात.

1) आयनिक बंध:

दोन किंवा अधिक धातू – अधातू मध्ये इलेक्ट्रॉन ची देवाण-घेवाण होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधास  आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात.

उदा: सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड

सोडियम अणूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 1 असून क्लोरीन अणूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 7 आहे.

सोडियम आपल्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला  देतो, व दोघांच्या बाह्यतम कक्षेत पूर्ण होऊन अष्टक स्थिती प्राप्त होते.

सोडियम ने एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयनाची निर्मिती होते, त्यालाच सोडियम आयन असे म्हणतात. तर क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे ऋण आयनांची निर्मिती होते त्यालाच क्लोराईड आयन असे म्हणतात.

तसेच त्यांच्यातील या रासायनिक बंधाला आयनिक बंध असे म्हणतात.

2) सहसंयुज बंध

दोन किंवा अधिक अधातूमध्ये भागीदारी होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधास सहसंयुज बंध असे म्हणतात.

दोन हायड्रोजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन हायड्रोजन रेणू तयार होतो.

हायड्रोजन व क्लोरिन मध्ये इलेक्ट्रॉन ची भागीदारी होऊन हायड्रोजन क्लोराईड तयार होते.

भागीदारी करतांना त्या अधातूंच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात व त्यानंतर त्या अधातूंना स्थिर होण्यासाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये वापरतात.

भागीदारीतील इलेक्ट्रॉन दोन्हीही अधातूंसाठी सामाईक असतात.

बाह्यतम कक्षेलाच संयुजा कक्षा असे म्हणतात. तसेच त्यांच्यातील रासायनिक बंधाला सहसंयुज बंध असे म्हणतात.

समान व भिन्न अधातू मध्ये भागीदारी मध्ये किती इलेक्ट्रॉन भाग घेतात त्यानुसार सहसंयुज बंधाचे तीन प्रकार पडतात.

1)  एकेरी सहसंयुज बंध

समान किंवा भिन्न अधातूमध्ये दोन इलेक्ट्रॉनची किंवा एका जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला एकेरी सहसंयुज बंध असे म्हणतात. या बंधाला ‘-’ या चिन्हाने दर्शवितात.

2) दुहेरी सहसंयुज बंध

समान किंवा भिन्न अधातूमध्ये चार इलेक्ट्रॉनची किंवा दोन जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला दुहेरी सहसंयुज बंध असे म्हणतात. या बंदला बंधाला ‘=’ या चिन्हाने दर्शवितात.

3) तिहेरी सहसंयुज बंध

समान किंवा भिन्न अधातू मध्ये सहा इलेक्ट्रॉनची किंवा तीन जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला तिहेरी सहसंयुज बंध असे म्हणतात.

याबंधाला ‘==’ या चिन्हाने दर्शवितात.

आयनिक संयुगे आणि सहसंयुजी संयुगे

No comments:

Post a Comment