Saturday, 18 July 2020

अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार


🌷भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला. अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

🌷या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.

ठळक बाबी

🌷भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा ठरतो. करारानुसार, इंधनसाठ्यांसाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. तसेच तेलाची साठवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन साठवण केंद्राचा वापर भारत करू शकतो.

🌷अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...