🖍ठिकाण :- ढाका
🖍संस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला
🖍मुख्यालय :- लखनऊ
🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये
सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता.
🖌 मुस्लिम लीगची स्थापना ‘All Indian
Mohammadan Educational Conference’
च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी
करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती.
🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला.
🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले.
🖌मुस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
🖌पुढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.
📚मुस्लिम लीगचे अध्यक्ष📚
1907 अहमजी पीरभॉय
1908-1912 आगाखान
1912-1918 सर मुहम्मद अली
1919-1930 मुहम्मद अली जिना
1931 सर मुहम्मद शफी
1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान
1932-1933 मिया अब्दुल अझीझ
1933-1934 हफिज हिदायत हुसेन
1934-1947 मुहम्मद अली जिना
▼
No comments:
Post a Comment