Monday, 15 November 2021

रँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.

सध्या पुण्यातल्या कोरोनाच्या महामारीने राज्यातील मुंबई व इतर शहरांना मागे टाकलं आहे. अजूनही हा रोग ठोस उपाय न सापडल्यामुळे नियंत्रणात येऊ शकलेला नाही. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा यांना रोजच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे.

असेच महाभयंकर संकट पुण्यावर १८९७ साली कोसळले होते. ब्युबोनिक प्लेग.
कलकत्ता, मुंबईच्या पाठोपाठ हा संसर्गजन्य रोग पुण्यात देखील दाखल झाला. उंदीर मेल्याप्रमाणे पटापट लोक मरु लागले. तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने युद्धपातळीवर तयारी सुरु केली. केवळ अलंकारिक अर्थाने नव्हे तर पुण्याच्या कलेक्टरला लष्करी अधिकार दिले.

तसेच सातारचा कडक शिस्तीचा लष्करी अधिकारी वाल्टर रँड याची प्लेग कमिशनर म्हणून केली. ही घटना साधारण फेब्रुवारी १८९७ मधली आहे.
रँडने तातडीने पुण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. गावाबाहेर मुळामुठाच्या संगमाजवळ एक प्लेगचे इस्पितळ उघडण्यात आले. शिवाय विलीगीकरणासाठी वेगळी छावणी उघडण्यात आली. लेफ्टनंट ओवेन याला रुग्ण छावणीची जबाबदारी देण्यात आली.

प्लेगचे रुग्ण शोधून काढणे हेच सरकारपुढे मोठे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने सर्चपार्टी बनवली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तेव्हा मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. पुण्यातील लोकांचा पुढारी व एक जबाबदार पत्रकार या नात्याने टिळकांनी प्लेग विरुद्धच्या लढाईत उडी घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून रोगासंबंधी लोकशिक्षण देण्यास सुरवात केली.

टिळकांनी प्लेग दुःख निवारण समितीची स्थापना केली होती.
हा रोग, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना याविषयीचे लेख त्यांनी आपल्या पत्रातून छाप्ले परंतु सार्वजनिक आरोग्याचे नियम ण पाळणाऱ्या अनाठायी भीतीपोटी  शहर सोडून जाऊ इच्छिनाऱ्या सरकारी आरोग्य सेवकांशी योग्य सहकार्य न करणाऱ्या नागरिकांची त्यांनी कानउघडणी केली.

निदान सुरवातीला तरी रँडच्या पथकातील सोजिरांनी कोणाच्याही घरात तपासणीसाठी जाताना स्थानिक स्वयंसेवकांना सोबत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुरवातीला लोकमान्य टिळक देखील जातीने या पथकाबरोबर काही घरांमध्ये गेले होते.

पण नंतर नंतर प्लेगची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. तसे लोकांमध्ये घबराटीचे प्रमाण वाढले व सरकारी यंत्रणा देखील दबावाखाली आल्या.
दुष्काळाची आपत्ती अस्मानी असेल तर ही आपत्ती सुलतानी आहे म्हणजेच हा रोग सरकारने पसरवला आहे असं पुणेकरांनी समजूत करून घेतली.
एकोणिसाव्या शतकातला तो काळ. शिक्षणाचा अभाव व जातीपात, अंधश्रद्धा यांची जबरदस्त पकड  यामुळे लोक प्लेगचे रुंग शोधायला येणाऱ्या सैनिकांना सहकार्य करेनासे झाले.

cचे सोजीर संशयाच्या आधारे कोणाच्याही घरी घुसत होते. अगदी देवघरापर्यंत बूट घालून वावरत होते, स्त्रियांचीही असभ्यपणे तपासणी करत होते हे कर्मठ पुण्याच्या लोकांना आवडले नाही. हे सैनिक घरातील सामान रस्त्यावर फेकतात, नासधूस करतात अशा विविध कारणांनी असंतोष निर्माण होऊ लागला.

विटंबनेपेक्षा रोग बरा असंच लोकांना वाटू लागल.

टिळक व इतर नेत्यांनी जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या कलाने तपासणी करायचा आग्रह धरला पण वाढत्या रुग्णसंख्येने दबावात आलेल्या रँडने याकडे साफ दुर्लक्ष केले.

याच बरोबर प्लेग रुग्णालयातही रोग्याची व्यवस्था नीट होत नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. तिथे देखील रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. काही रुग्ण इतर जातीच्या रुग्णासोबत आपल्याला ठेवू नका असा विचित्र आग्रह धरताना सुद्धा दिसत होते. भारतीय समाजव्यवस्थेचे हे कांगोरे इंग्रज अधिकाऱ्यांच्या आकलनाबाहेरचे होते.

अखेर प्रत्येक धर्मासाठी त्यांच्या खर्चाने प्लेग रूग्णालये उघडण्यास परवानगी देण्यात आली. हिंदू मुस्लीम पारसी व युरोपीय रुग्णांसाठी ससून, याच बरोबर संगमावरचे जनरल प्लेग हॉस्पिटल असे एकूण पाच प्लेग रुग्णालये पुण्यात सुरु झाली.

हिंदू प्लेग हॉस्पिटलची जबाबदारी लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या शिरावर घेतली.
त्यांनी या हॉस्पिटलबरोबर एक विलगीकरण छावणी देखील सुरु केली. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हे रुग्णालय त्यांनी चालवून दाखवले.

इतर पुण्यातील इतर नेते प्लेगच्या भयाने शहर सोडून जात होते तेव्हा लोकमान्य टिळक रुग्णांच्या शुश्रूषेत व मृतांच्या अंत्यक्रियेत मग्न होते.
रँडच्या दडपशाहीविरुद्ध टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडल होत. नुकताच येऊन गेलेला दुष्काळ, त्यात रोगराई असतानाही ब्रिटीश अधिकारी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहनाच्या ज्युबली निमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करत आहेत, मोठमोठ्या पार्ट्या झोडत आहेत यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

अशातच चाफेकर बंधूनी गणेशखिंडीत रँडचा खून केला.
रँडने केलेल्या प्लेगच्या साथीत केलेल्या अत्याचारामुळे चिडलेल्या चाफेकर बंधूनी हे कृत्य केले होते. अनेकांचा दावा होता की लोकमान्य टिळकांची त्यांना आशीर्वाद होता. त्यांच्या आ

No comments:

Post a Comment