Saturday, 18 December 2021

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (सहगल)


🔸भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला,सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन...
🔸जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्यापोटी चेन्नई येथे...
🔸वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील तर आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या...
🔸लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (1928)...
🔸या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले.त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मींवर प्रभाव...

🔸लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग व अटक.पण शाळा,महाविद्यालयांवर बहिष्काराची कृती त्यांना अमान्य होती.स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे,असे त्यांचे मत...
🔸महाविद्यालयात BKN राव या विमानचालकाशी परिचय व विवाह.माञ पुढे मतभेद व विभक्त...
🔸मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBS (1938) तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण(1939)...
🔸चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला (1940).तिथे भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना...

🔸नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (1943).२ जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर...
🔸त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी,अशी इच्छा व्यक्त केली..
🔸या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या,शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले...
🔸सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले.21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले...
🔸1944 पर्यंत 1000 महिला जवान व 500 परिचारिका जवान अशी 1500 ची पलटण झाली...
🔸जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले...
🔸‘चलो दिल्ली‘ हे त्यांचे लक्ष्य.मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली (1945).तेव्हा आझाद हिंद सेनेची माघार..
🔸युद्धविरामापर्यंत कॅ.लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल...
🔸त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या.1 वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या (1946).भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर सुटका...

🔸भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाह (1947).कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला...
🔸भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले...
🔸त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या.पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली (1971)...
🔸बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या,वैद्यकीय मदत...
🔸भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा (1984)..

🔸दैदीप्यमान कर्तृत्वाबद्दल पद्मविभूषण (1998)...
🔸अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपती निवडणूकीत पराभूत (2002)...
🔸2012-कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन...
🔸प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) या त्यांच्या धाकट्या भगिनी होत...

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...