Monday 13 July 2020

अमेरिका, ब्रिटन, चीनला मागे टाकून करोना लस संशोधनात रशियाने मारली बाजी


📌संपूर्ण जगाला करोना व्हायरसने त्रस्त करुन सोडले आहे. या व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळयांचेच लक्ष लागले होते.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.

📌स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

📌रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.

📌"करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत" असे तारासोव्ह यांनी सांगितले. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोना व्हायरसला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.

📌सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.

📌मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्याससाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले. करोना व्हायरसवर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १२० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...