Monday, 29 November 2021

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

🔸जन्म- 23 जुलै 1856 रत्नागिरी, चिखली.
🔸मूळ नाव - केशव
🔸मराठा (इंग्रजी भाषेत) - 2 जानेवारी 1881 संपादक टिळक.
🔸केसरी (मराठी भाषेत) - 14 जानेवारी 1881 संपादक आगरकर.
🔸1893 - सार्वजनिक गणपती उत्सव .
🔸1895 - शिवजयंती उत्सव.
🔸1905- स्वदेशी चळवळ सुरू करून "स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण" या चतुसूत्री चा पुरस्कार केला.
🔸मृत्यू- 1 ऑगस्ट 1920
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔹सामान्य जनतेशी जवळचा संपर्क ठेवणारे टिळक हे पहिले राष्ट्रीय नेते.

🔹देशासाठी तुरुंगात जाणारे टिळक हे पहिले काँग्रेस नेते.

🔹टिळकांनी सर्वात प्रथम स्पष्ट शब्दात स्वराज्याची मागणी केली, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी घोषणा केली.

🔹टिळकांना "लोकमान्य व भारताचा अनभिषिक्त राजा" म्हणून ओळखले जात असे.

🔹जनतेला संघटित करण्यासाठी त्यांनी आखाडे, लाठी क्लब, गोवध विरोधी संस्था, गणपती व शिवाजी उत्सव सुरू केले.

🔹त्यांनी बिपिनचंद्र पाल व लाला लजपतराय यांच्यासोबत जहाल गट निर्माण केला.

🔹त्यांच्या प्रयत्नांमुळे 1906 च्या कोलकता अधिवेशनात "स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण" हे ठराव संमत करण्यात आले.

🔹व्हॅलेंटाईन चिरोल याने टिळकांना "भारतीय असंतोषाचे जनक" असे संबोधले.

🔹लखनऊ करारावर टिळक व जीना यांनी सह्या करून राष्ट्रीय सभा व लीग यांच्यात राष्ट्रीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

🔹बॅरिस्टर जीना टिळकांना गुरुस्थानी मानत.
टिळक हे निष्णात गणितज्ञ  तसेच भाषातज्ञ होते.

🔹टिळकांचे गीतारहस्य मराठीत होते.

🔹इंग्लंडमधील कामे आटपून टिळक 6 नोव्हेंबर 1919 ला "इजिप्त" नावाच्या बोटीतून भारतात यायला निघाले. हा प्रवास साधारण वीस दिवसांचा होता. यावेळी डॉक्टर वेलकर त्यांच्यासोबत होते.

🔹"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव म्हणणार नाही" असे उद्गार लोकमान्य टिळक यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन च्या दुसऱ्या सभेत काढले.

♦️पी. सीतारामय्या- " गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक काळाच्या पुढे होते."

♦️महात्मा गांधी- "टिळक हे मला उत्तुंग हिमालयासारखे वाटले."

♦️अरविंद घोष- "धडाडी, स्वार्थत्याग कष्टाळूपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, व व्यवहारी वृत्ती या सर्वांचा समावेश टिळकांमध्ये होता."

No comments:

Post a Comment