Thursday, 6 January 2022

आंदोलने आणि महात्मा गांधी.


🅾स्वातंत्र्याच्या आंदोलनाची भारतीय स्वातंत्र्याची गांधीयुगाची ही सुरुवात होती.

🅾१९१९मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली. महात्मा गांधी काँग्रेसचे महासचिव झाले. जगाच्या पाठीवर कुठेही एकाचवेळी, एकाच उंचीचे इतके मोठे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीत हातात हात घालून लढत आहेत, असा एकही देश नाही, हे भारताने दाखवले.

🅾महात्माजींच्या पाठोपाठ सरदार पटेल, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्रप्रसाद अशी नेतृत्वाची एक रांग या देशात निर्माण झाली. आज असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या जिल्हा समित्या महात्माजींनी स्थापन केलेल्या आहेत. केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई न लढता सामाजिक समतेचा आग्रह हा महात्माजींच्याच नेतृत्वाने काँग्रेसला दिलेला मंत्र होता. जातीभेदाविरुद्धची लढाई, दारूबंदीचा आग्रह हे काँग्रेसचे त्यावेळचे कार्यक्रम होते.

🅾गांधीजींच्या नेतृत्वामुळेच अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे एक मोठे तत्त्वज्ञान जगाला काँग्रेसनेच दिले. गांधीजींच्या नेतृत्वाने सगळे जग स्तिमित झाले.

🅾१९३०चा मिठाचा सत्याग्रह, १९४२चा ‘चले-जाव’ आंदोलनाचा लढा, हे सगळे काँग्रेसच्या इतिहासातले देदीप्यमान टप्पे आहेत. त्याहीपेक्षा ज्याला ‘काँग्रेस संस्कृती’ असे म्हटले जाते, ती ‘काँग्रेस संस्कृती’ म्हणजे सर्व जातीधर्माच्या समुदायाने हातात हात घालून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा.

🅾गंधाचा टिळा कपाळावर लावून कट्टर हिंदू असलेले मदनमोहन मालवीय, मौलाना अबुलकलाम आझाद यांच्या हातात हात घालून स्वातंत्र्यासाठी लढले आणि पारशी असलेले वीर नरिमन या दोघांच्या बरोबर राहिले. खान अब्दुल गफार खान त्यांच्या मागे उभे होते.

🅾पुढे गांधी, नेहरू, राजेंद्रप्रसाद होते. ही ती काँग्रेस संस्कृती आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन स्वातंत्र्याचा लढा लढायचा आणि स्वातंत्र्यानंतर सर्व जातीधर्माच्या सहभागाने देशाची बांधणी करायची, हीच काँग्रेस संस्कृती आहे. हा देश एका जातीचा, एका धर्माचा कधीही होऊ शकत नाही, हाच काँग्रेसचा विचार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...