Sunday 5 July 2020

पोलीस भरती प्रश्नसंच

▪️ कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली?
उत्तर : जर्मनी

▪️ कोणत्या देशात ‘पीच ब्लॅक’ नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

▪️ कोणती संस्था ‘ओपन बजेट सर्वे’ आयोजित करते?
उत्तर : इंटरनॅशनल बजेट पार्टनर्शिप

▪️ कोणत्या व्यक्तीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : श्रीकांत माधव वैद्य

▪️ कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे पुढचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : टी. एस. तिरुमूर्ती

▪️ ‘सयाजीराव गायकवाड III: महाराजा ऑफ बडोदा’ या शीर्षकाखाली ऐतिहासिक चरित्रकथा कुणी लिहिली?
उत्तर : उमा बालसुब्रमण्यम

▪️ कोणत्या देशापुढे भारताने 150 दशलक्ष डॉलर एवढे मूल्य असलेले करन्सी स्वॅप करण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
उत्तर : मालदीव

▪️ कोणत्या राज्यात ‘जीवन अमृत योजना’ लागू करण्यात आली आहे?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️कोणत्या राज्य सरकारने ‘डोअरस्टेप अंगणवाडी’ नावाने एका उपक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : गुजरात

▪️ HUDCO या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : शिव दास मीना

▪️ कोणत्या ठिकाणी 2021 साली पुरुषांची जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : बेलग्रेड, सायबेरिया

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आयुर रक्षा क्लिनिक’ कार्यरत केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ निधन झालेले रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : इतिहास कार्य

▪️ प्रथमच कोणता देश आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 4 मे

▪️ कोणत्या मंत्रालयाने “अ रे ऑफ जीनीयस” हा लघुपट प्रदर्शित केला?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या मंत्रालयाने “प्रोफ. बी. बी. लाल - इंडिया रिडिसकव्हर्ड” हे शीर्षक असलेले ई-पुस्तक प्रकाशित केले?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) नावाचे उपकरण विकसित केले?
उत्तर : राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था

▪️ कोणत्या संस्थेनी UV ब्लास्टर नावाचे एक निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...