Thursday, 23 December 2021

काळाराम मंदिर सत्याग्रह" एक क्रांतिकारक घटना

◾️केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवलाली येथे प्रथम 29 डिसेंबर 1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली

◾️"आम्ही जर हिंदू असू तर आम्हाला मंदिरात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही"

ही समानतेची वागणूक मिळावी यासाठीचा हा लढा होता

◾️सत्याग्रह समितीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा

◾️भाऊराव उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते.

◾️तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद 

◾️शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील

◾️मोठ्या राजवाड्यातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल

◾️2 मार्च 1930 ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.

◾️नाशिकचे जिल्हाधिकारी "R. G. गॉर्डन" यांनी मध्यविभागाचे आयुक्त "घोषाळ" यांना सत्याग्रहाची माहिती कळविली होती

◾️2 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, डी.व्ही.प्रधान, बाळासाहेब खरे, स्वामी आनंद हे होते.

◾️गोदावरीच्या रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली. 

◾️ इंग्रजांनी शंकरराव गायकवाड यांना रामकुंडात उडी मारली म्हणुन काठीने मारले

◾️सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून, ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली

🔺"आम्ही पण एक सजिव माणूस आहोत"
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आम्हाला काळाराम मंदिराचा प्रवेश करून कोणी रामभक्त बनायचे नाही, तर या भारत देशामध्ये असणा-या दगड जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की, आम्ही पण एक सजिव माणूस आहोत हे दाखवून द्यायचे आहे. तुमच्या या मंदिरामध्ये कुञी, मांजरे, शेळ्या, मेंढया हे प्रवेश करू शकतात. तर आम्ही का नाही...?

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...