Monday, 6 July 2020

आशियाई विकास बँक भारताच्या मदत

- आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलरची (१६५०० कोटी रुपये ) मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी २.२ अब्ज डॉलर म्हणजे १६५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

- असाकावा यांनी सीतारामन यांना दूरध्वनी करून भारताने करोनाविरोधात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर

- कर कपात व इतर सवलतींसह १.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे. २६ मार्च रोजी सीतारामन यांनी ही १.७ लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.

- आसाकावा यांनी म्हटले की, आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल. बँकेने याआधी भारतासह काही देशांना ६.५ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण ६८ देश या बँकेचे सदस्य आहेत.

- सीमाभागांमध्ये सतर्क राहण्याचे गृहमंत्र्यांचे बीएसएफला निर्देश

- पाकिस्तान व बांगलादेशसोबत लागून असलेल्या सीमांवर, विशेषत: कुंपण नसलेल्या भागांमध्ये सतर्कता वाढवावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) दिले आहेत. गृहमंत्र्यांनी या दोन्ही सीमांवरील सुरक्षाविषयक स्थितीचा गुरुवारी आढावा घेतला.

- या दोन्ही आघाडय़ांवर सीमेपलीकडून कुठलीही हालचाल होणार नाही हे सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी बीएएसएफला दिले, असे मंत्रालयातील सहसचिव पुण्यसलील श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...