Saturday, 11 July 2020

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत.

🌺🌺लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत.🌺🌺

🔰“सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत अधिक भर पडली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी आम्ही परीक्षा रद्द करण्याची आमची भूमिका मांडली,” असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

🔰काही दिवसांपूर्वी राज्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर यूजीसीनं सप्टेंबर अखेरिस परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या संपूर्ण विषयावर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी झालेल्या चर्चेबद्दल आणि त्यांची मतं काय होती याबाबतही माहिती दिली.

🔰“सप्टेंबरल महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. ६ एप्रिल रोजी आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन केली. सहा कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होतं.

🔰त्यानंतर २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या गाडईलाईन्स आल्या. त्यामध्ये करोनाच्या परिस्थितीत तिथल्या शासनानं निर्णय घ्यावा, तसंच करोनाची परिस्थिती पाहून तिथल्या शासनानं आणि विद्यापीठांनी गाईडलाईन्स ठरवण्याचं सांगण्यात आलं होतं,” असं सामंत यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...