Saturday 18 July 2020

स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ काँग्रेस नेते कुमारस्वामी कामराज


(15 जुलै 1903 - 2 ऑक्टोबर 1975)

🔸देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग आणि 6 वेळा तुरूंगवास (3000 दिवस कैदेत)...
🔸1954 ते 1963 दरम्यान तत्कालीन मद्रास म्हणजेच आताच्या तमिळनाडूचे 3 रे मुख्यमंत्री...
🔸जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा (काँग्रेस अध्यक्ष) सांभाळणार्‍या कामराजांनी 1967 साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे (काँग्रेस-O) नेतेपद सांभाळले...
🔸1952-54 आणि 1969-75 लोकसभा खासदार...
🔸गांधीजींच्या विचारांचे अनुयायी असलेले कामराज यांनी 2 ऑक्टोबर 1975 रोजी म्हणजेच गांधी जयंती दिवशी जगाचा निरोप घेतला होता...
🔸त्यांच्या मृत्यूनंतर 1976 साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न पुरस्कार दिला...
🔸कामराज यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या विमानतळास त्यांचे नाव देण्यात आले आहे...
🔸अत्यंत साधे जीवनमान जगणाऱ्या कामराज जेव्हा या जगातून निघून गेले होते तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांच्या मागे शिल्लक होते ते फक्त 130 रुपये,2 चपलाचे जोड,4 शर्ट,4 धोतरजोड,काही पुस्तके आणि मोठं कर्तत्व...

No comments:

Post a Comment