Sunday, 5 July 2020

गुलजारीलाल नंदा

🔸 भारताचे दोन वेळा प्रत्येकी 13-13 दिवसांसाठी पंतप्रधान...
🔸साधं राहणीमान असणारे पंतप्रधान म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते लालबहादूर शास्त्री...
👉निर्विवादपणे लालबहादूर शास्त्री याचं राहणीमानं अगदी साधच होतं,पण त्यांच्यासारखेच अजून एक पंतप्रधान भारताला लाभले.दुर्देवाने त्यांची कारकिर्द कार्यवाहक पंतप्रधानाची असल्याने त्यांचे किस्से त्यांच्या कथा खूप कमी वाचायला मिळाल्या असतील...

🔸गुलजारीलाल नंदा हे नाव आठवतय. MPSC,UPSC करणाऱ्या मुलांना देखील गुलजारीलाल नंदा म्हणल्यानंतर कोणाच्या अगोदर आणि कोणाच्या नंतर किती दिवस कार्यवाहक पंतप्रधान होते या पलिकडे त्यांची माहिती नसावी...

👉गुलजारीलाल नंदा एक सरळ साधं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या संभाळल्या.पैशाचा मोह नाही कि सत्तेचा मोह नाही.कदाचित राजकारणाच्या पारदर्शक काळात देखील त्यांना जमवून घेणं अनेकांना जड जात होतं...

🔸शेवटच्या दिवसांमध्ये पेन्शनसाठी अर्ज केला होता.गुलजारीलाल नंदा यांनी आपल्या शेवटच्या काळात स्वातंत्रसैनिकांची पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केला होता.आज त्यांचा जन्मदिन...

No comments:

Post a Comment