Wednesday, 22 July 2020

राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष

______________________________________
🔰 राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते.
______________________________________
📌 (अ) चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत.

किंवा
📌 (ब) एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान २% मतदारसंघांमधून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते.

🔰 प्रादेशिक किंवा राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केले आहेत.

📌 अ) लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६% मते मिळवणे आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते.

किंवा
📌 (ब) विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान ३% जागा किंवा किमान ३ जागा प्राप्त करणे आवश्यक आहे.
___________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...