Friday 12 November 2021

लॉर्ड मेयो


🍁  कार्यकाळ

👉 (१८६९-१८७२) :

🌸  सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली.

🍁  डिसेंबर १८७० मध्ये  रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या.

🌸  १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले.

🍁   सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२  मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात.

🌸   जानेवारी, १८७२ मध्ये  अंदमान  येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.

🍁🍁🍁🍁☘☘🍁🍁🍁🍁☘☘

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...