Saturday 25 July 2020

भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान.

🔰सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका 59 वर्षीय परिचारिकेला (नर्स) राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

🔰करोना महामारीमध्ये रुग्णांची सेवा केल्याबद्दल परिचारिकांसाठी असलेल्या राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

🔰सिंगापूरमध्ये करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या पाच परिचारिकांना हा पुरस्कार देण्यात आला असून यात कला नारायणसामी यांचाही समावेश आहे.

🔰सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत मंगळवारी माहिती देण्यात आली.

🔰सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांचं हस्ताक्षर असलेल्या प्रमाणपत्रासह एक ट्रॉफी आणि 10,000 एसजीडी (सिंगापूरचं चलन) देण्यात आले.

No comments:

Post a Comment