१) जाळीदार जलनिस्सारण प्रारूप (trellised)
-प्रादेशिक उतारानुसार प्रधान अनुवर्ती(consequent) जलप्रवाह आणि तिच्या उपनद्या यांचे जाळे आणि भूशास्त्रीय रचनेशी समायोजन करणाऱ्या जलनिस्सारण आकारास जाळीदार प्रारूप असे म्हणतात
-ज्या क्षेत्रामध्ये साधी वळी रचना असून समांतरपणे अपणती कटक आणि आलटून पालटून समांतर अभिनेती दरया असतात त्या प्रदेशात जाळीदार जलनिस्सारण प्रारूप विकसित होतात
-जाळीदार आणि आयताकृती प्रारूपामध्ये थोडाफार सारखेपणा असला तरीही जाळीदार प्रारूपामध्ये हे प्रवाह यामधील अंतर कमी असते तर आयताकृती प्रारूपामध्ये प्रवाहातील अंतर विस्तारित असते
-असे प्रारूप cuesta टॉपोग्राफी असणाऱ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळतात
-उदाहरण म्हणजे दामोदर आणि कॉलोराडो नदीचे जलप्रवाह
२) वृक्षाकार जलनिस्सारण प्रारूप (dendritic)
-प्रधान प्रवाहाची महत्ता आणि उपनद्या यांच्या विविध सूरचनेचे जाळे एखाद्या या वृक्षाच्या शाखा ,मूळ आणि उपमुळे सारखे दृश्यमान होते तेव्हा त्यास वृक्षकार प्रारूप असे म्हणतात
-उदाहरण म्हणजे भारतातील महानदी, गोदावरी, कृष्णा ,कावेरी आणि आणि भीमा नद्यांचे खोरे
३) आयताकृती जलनिस्सारण प्रारूप (rectangular)
-खडकांचे जोड किंवा संधी असणाऱ्या प्रदेशात प्रधान जलप्रवास उपनद्या काटकोनात मिळतात याला आयताकृती जलनिस्सारण प्रारुप असे म्हणतात
-असे प्रारूप karst टॉपोग्राफी प्रदेशात पाहायला मिळतात
४) केंद्रोत्सारी जलनिस्सारण प्रारूप (radial)
-मध्य भागाच्या उंचवट्याच्या प्रदेशांमधून सर्व दिशांना अपक्षरण होणाऱ्या प्रवाहांना केंद्रोत्सारी जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-श्रीलंका या देशाच्या मध्यभागातून हे प्रारूप उठून दिसते
-भारतामध्ये अमरकंटक टेकड्या, झारखंडमधील हजारीबाग पठार आणि राजस्थान मधील अबू पर्वत ही या प्रारूपाची आदर्श उदाहरणे आहेत
५) केंद्रभीगामी जलनिस्सारण प्रारूप (centripetal)
- सभोवतालच्या उंचवट्याच्या प्रदेशापासून उगम पावणारे प्रवाह मध्यभागाच्या सखल प्रदेशातील गर्तीका सरोवराकडे केंद्रभिमुख होतात याला केंद्रभिगामी प्रारूप असे म्हणतात
-याचे आदर्श उदाहरण नेपाळमधील काठमांडू दरी आहे
६) कंकणाकृती जलनिस्सारण प्रारूप(annular)
-घुमटाकार पर्वतामध्ये आलटून-पालटून कठीण आणि मृदू खडकाची वर्तुळाकार रचना असल्यावर प्रधान अनुवर्ती प्रवाहाच्या उपनद्या वर्तुळाकार विकसित होतात याला कंकणाकृती जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-याचे उत्तम उदाहरण बिहारमधील सोनपेठ घुमटाकार प्रदेश आहे
७) कंटकिय किंवा काटेरी जलनिस्सारण प्रारूप(barbed)
-प्रधान जलप्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या उपनद्या मुळे निर्माण होणाऱ्या जाळ्यात कंटकीय जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-अशा प्रकारचे प्रारूप सर्वसाधारणपणे नदीचौर्यामुळे(river capture) विकसित होते
८) पीसाकृती जलनिस्सारण प्रारूप (pinnate)
-समांतर घटकाच्या तीव्र बाजूंनी उपनद्यांचा उगम पावून दरीमधील अनुलंब प्रधान अनुवर्ती प्रवाहास लघुकोनात मिळतात याला पिसाकृती जलनिस्सारण प्रारूप असे म्हणतात
-ऊर्ध्व शोन आणि नर्मदा नद्यांमध्ये पीसाकृती जलनिस्सारण प्रारूप निर्माण झाले आहे
No comments:
Post a Comment