जन्म:- १७ ऑक्टोबर १८१७
मृत्यू:- २७ मार्च १८९८
◆ हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत.
◆ भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते.
◆ सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला.
◆ सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.
◆ सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला.
◆ आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली.
◆ इ.स. १८७७ मध्ये त्यांची Imperial [मराठी शब्द सुचवा] विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.
◆ २७ मार्च , १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
◆ भारतीय राजकारणात सय्यद अहमद यांनी जमातवादाची सुरुवात केली.
◆ कॉंग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती.
◆ इंग्रज शासनाशी सहकार्य करण्यातच मुस्लीम समाजाचा उध्दार आहे अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ अगदी १८५७ च्या बंडात मुसलमानांनी भाग घेऊ नये असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले होते . तसेच कोणत्या मुसलमानांनी बंडात भाग घेतला , कोणी इंग्रजाना सहकार्य केले याचा तपशील इंग्रजाना पटवून देऊन त्यांना खुश केले.
◆ सर सय्यद अहमद यांच्या मते , या बंडात मुस्लिमांनी सामील होण्याचे कारण म्हणजे लष्करातल्या हिंदू मुसलमानाचे संयुक्त जीवन होय. या संयुक्त जीवनास त्यांचा विरोध होता.
◆ कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर हा अलगाववाद वाढीस लागला अगदी आय. सी. एस. च्या परीक्षा भारतात घेण्याच्या कॉंग्रेसच्या मागणीस त्यांनी विरोध दर्शविला .
◆ त्यांच्या मते भारतात या परीक्षा घेतल्यास फक्त हिंदुनाच त्याचा फायदा होईल. हिंदुशी एकजूट करण्यात मुसलमानाचा फायदा नाही असा त्यांचा पक्का ग्रह होता.
◆ सय्यद अहमद यांची भूमीका अधिक कडवी होण्यास अलीगड विद्यापीठाचे प्राचार्य थिओडोर बेक यांचाही मोठा वाट आहे.
◆ त्यांच्या प्रभावामुळे सय्यद अहमद कट्टर जातीयवादी बनले.व मुस्लीमांना व्याहारिक फायदे मिळवून देण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु झाले .
No comments:
Post a Comment