Tuesday 21 July 2020

इंग्रजी वृत्तपत्रे :

√ मराठी वृत्तपत्राप्रमाणेच मुंबई प्रांतात इंग्रजी वृत्तपत्रेही सुरू होती.

√ महाराष्ट्रात वृत्तपत्राचा प्रारंभ इ.स. १७८९ मध्ये बाँबे हेरॉल्ड या साप्ताहिकाने केला.

√ इ.स. १७९० मध्ये बाँबे करिअर आणि इ.स. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट ही वृत्तपत्रे सुरू झाली.

√ 'बाँबे टाइम्स' हे वृत्तपत्र इ.स. १८३२ मध्ये व 'टाइम्स ऑफ इंडिया' हे वृत्तपत्र १८३९ मध्ये सुरू झाले.

√ रॉबर्ट नाईट यांनी बाँबे टाइम्स, स्टैंडर्ड व टेलीग्राफ या ३ वृत्तपत्रांचे एकत्रीकरण करून इ.स. १८३२ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले होते.

√ इंग्रजी वृत्तपत्रे इंग्रजांसाठी इंग्रजांकडून चालविली जात होती.

√ या काळात वृत्तपत्राबाबत कायदे नव्हते. पण त्यांचे भवितव्य कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीवरच अवलंबून होते.

√ यामध्ये भारताच्या संस्कृतीचे दर्शन नव्हते. याशिवाय ब्रिटिश प्रशासनावर टीकाही केली नव्हती.

No comments:

Post a Comment